अपार कष्ट व मेहनतीमुळे यश निश्चित – दयानंद काणेकर, ट्रक्टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

अपार कष्ट व मेहनतीमुळे यश निश्चित – दयानंद काणेकर, ट्रक्टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

ट्रक्टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना मान्यवर. 

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

एखादे काम करण्यासाठी आपण किती मेहनत घेतो. यावरुन त्याचे यश अवलंबून असते. कोणतेही काम लहान-मोठे नाही. पुर्ण क्षमतेने झोकून देवून काम करा. यश तुमचेच आहे. दळवींनी केलेले काम व त्यासाठी घेतलेले अपार कष्ट यामुळेच ते आज यशस्वी आहेत. व्यवसाय किंवा उद्योग करतानाही कामामध्ये सातत्य असणे गरजेचे असल्याचे मत पंचायत समिती सदस्य व उद्योजक दयानंद काणेकर यांनी केले. चंदगड येथे आयोजित ट्रक्टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका या अशोक दळवी (कळसगादे) यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. 

प्रारंभी प्रास्ताविक ट्रक्टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका या पुस्तकाचे लेखक अशोक दळवी यांनी केले आहे. सद्याच्या स्पर्धेच्या युगात अपार मेहनतीने यश निश्चित मिळवता येते. या पुस्तकातून ट्रक्टर ड्रायव्हर म्हणून काम करताना आलेले अनुभव व एलआयसीमध्ये विमा सल्लागार ते एमडीआरटी होण्यापर्यंत घेतलेले कष्ट यातील समाजोपयोगी प्रेरणादायी प्रसंगी वाचकांच्यासमोर ठेवले असल्याचे सांगितले. 

          यावेळी उद्योजक दयानंद काणेकर, माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, विजयकुमार दळवी, बापू देसाई (कान्ट्रक्टर), तानाजी सावंत, ॲड. सतोष मळविकर, यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांनी अशोक दळवी याने आपल्यातील चांगले गुण विकसित केल्यामुळेच तो आज एक यशस्वी माणूस म्हणून समाजात वावरत आहे. यासाठी त्याने घेतलेली मेहनत व चिकाटीमुळेच हे शक्य झाले आहे. 

         विजयकुमार दळवी यांनी प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत असताना त्यातील अनुभव पुस्तकातून लोकांच्यासमोर ठेवल्याने इतरांच्यासाठी ते प्रेरणादायी ठरतील असे सांगितले. ॲड. संतोष मळविकर यांनी अशोक दळवीने कष्टाच्या जोरावर मिळविलेले यश हे तरुण पिढीतील मुलांच्यासाठी निश्चितच दिशा देणारे आहे. ध्येयाच्या दृष्टीने आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर यश नक्की मिळते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. महादेव दळवी, परशराम गावडे, पांडुरंग जेलुगडेकर, परशरा गावडे या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. गणपत प्रधान यांनी सुत्रसंचालन केले. अशोक दळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गुंडुराव दळवी, गपणती आवडण, राजू दळवी, अनिल गावडे, दयानंद देसाई, विवेक पाटील, महेश भातकांडे यांच्यासह अशोक दळवी यांचे आई-वडील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
No comments:

Post a Comment