![]() |
निवृत्ती पाटील |
सुंडी (ता. चंदगड) येथील ११ मराठा लाईट इन्फंट्री चे सेवा मेडल विजेते सुभेदार निवृत्ती कल्लापा पाटील २८ वर्षांच्या सैन्य दलातील प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. यानिमित्य रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता सुंडी येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सुभेदार निवृत्ती पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झिमाना पाटील असणार आहेत. यावेळी प्रा. मायापा पाटील प्रमुख व्याख्याते म्हणून व्याख्यान देणार आहेत. निवेदन सदानंद पाटील करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन सुंडी ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment