काजिर्णे प्रकल्पग्रस्तासंदर्भात जलसंपदा मंत्र्याशी चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

काजिर्णे प्रकल्पग्रस्तासंदर्भात जलसंपदा मंत्र्याशी चर्चाचंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील काजिर्णे लघुपाटबंधारे प्रकल्प व प्रकल्पग्रस्तांसंदर्भात प्रकल्पदाता संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील यानी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेवून माहिती दिली. 

           काजिर्णे साठवण तलावाच्या भिंतींना चिपिंग न केल्यामुळे धरणाला धोका उद्भवू शकतो. शेतकऱ्यांची शिल्लक खासगी जमीन ढासळत आहे. काजू नारळ इत्यादी फळझाडे पाण्याच्या लाटांमुळे उन्मळून पडत आहेत. सांडव्याच्या पाण्यामुळे विजय नारायण टोपले कुटुंबियांची शिल्लक अडीच एकर जमिन निरूपयोगी झाली आहे. रामचंद्र लक्ष्मण दळवी कुटुंबियांची संपादन केलेल्या जमिनी व्यतिरिक्त अंदाजे दीड एकर जमिन फळझाडांसह ढासळली आहे. या दोन्हीकुटुंबियांच्या ढासळलेल्या जमिनींचे भूसंपादन कायदेशीरपणे करून आजच्या बाजारभावाने जमिन व फळझाडांचा मोबदला द्यावा.

        रामचंद्र दळवी यांच्या बाराशेहे फूट जमिनीला तोंडाकडून चिपिंग करून द्यावे , तलावाच्या साठवण भिंतीला चिपिंग करून द्यावे. इतर बाधीत होणाऱ्या प्रकल्पदात्यांनाही न्याय द्यावा, न्यायप्रविष्ठ भूसंदर्भ दाव्यामध्ये पाटबंधारे विभागाने अपिले दाखल न केल्यामुळे महाराष्ट्र सरकारला प्रतिवर्षी शेकडा १५ टक्के व्याजाचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे अपिले दाखल करण्याबाबत जलसंपदा मंत्रालयाने पाटबंधारे विभागाला सुचना द्याव्यात. काजिर्णे प्रकल्पदात्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे. सदर प्रश्न मार्गी न लागल्यास १ मार्चपासून चंदगड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाच इशारा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा विजयभाई पाटील यांनी दिला आहे.


 


No comments:

Post a Comment