चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका बांधकाम कामगार असोसिएशनला शासकीय मान्यता मिळाली आहे . सर्व बांधकाम कामगारांना एकत्र करून संघटीतपणे न्याय हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष कलाप्पा निवगिरे यांनी सांगितले.
कोल्हापूर येथे चंदगड तालुका बांधकाम कामगार आसोसिएशनचे नोंदणी प्रमाणपत्र कोल्हापूरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. डी. वाबळे व अॅड. महेश खांडेकर यांच्याकडून संघटनेचे अध्यक्ष कलाप्पा निवगीरे, उपाध्यक्ष बाबू चौगुले, सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार, सदस्य मारूती कांबळे, रघुनाथ पाटील, मोहन निवगीरे व संघटनेचे पदाधिकारी यांनी स्वीकारले.
No comments:
Post a Comment