बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे

कल्लाप्पा निवगिरे


चंदगड / प्रतिनिधी 

      चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशनच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील सर्व गंवडी,सेन्ट्रीग, पेन्टर,पल्बिंग,सूतार आशा बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व कामगारांना एकत्र करून संघटीत पणे त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याचे बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे यांनी सांगितले. चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशनला मान्यता मिळाल्याप्रसंगी ते बोलत होते. 

         चंदगड तालुक्यातील कामगारांना  बांधकाम क्षेत्रात काम आसताना त्यांना काही आपघात झाल्ययास त्यांच्या वारसांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. परंतु आता महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी बऱ्याच योजना सुरु केलेल्या आहेत. पण चंदगड तालुक्यातील बऱ्याच कामगारांना आजूनही या योजना माहीत नाहीत,त्यासाठीच  कल्याणकारी असोसिएशनच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावातील बांधकाम कामगारांना एकत्रित करून त्याची नोंदणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करून शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्ययासाठी,कामगारांची नोंदणी करण्यासाठी संघटने मार्फत सुरूते व कळसगादे या दोन ठीकाणी नोंदणी कार्यालय सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील बांधकाम कामगारानी कल्याणकारी असोसिएशन कडे नोंदणी करावी असे आवाहन श्री. निवगिरे यानी केले.
No comments:

Post a Comment