चंदगड तालुक्यातील यात्रोत्सवाला कोरोनाचे गालबोट, चंदगड, बागिलगे, नांदवडेसह सर्व यात्रा रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2021

चंदगड तालुक्यातील यात्रोत्सवाला कोरोनाचे गालबोट, चंदगड, बागिलगे, नांदवडेसह सर्व यात्रा रद्द

चंदगड तालुक्यातील सर्वात मोठी असणारी बागिलगेसहा आठ गावांची रवळनाथ यात्रेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा शुकशुकाट होता .

नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

     चंदगड तालुक्यात  फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणाऱ्या देव - देवींच्या यात्रोत्सवाला कोरोनाचे गालबोट लागले. यात्रा कमिट्यांनी नागरिकांच्या भल्यासाठी गावपातळीवर निर्णय घेऊन सर्वच यात्रा रद्द केल्या आहेत. त्यामुळे  कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे.  

        तालुक्यातील ६५ हून अधिक गावांमध्ये यात्रांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र चालू आठवड्यात कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आल्या. चंदगडची देव रवळनाथ, शिवनगेची जक्कूबाईची यात्रा वगळता बहुतांश यात्रा मांसाहारी केल्या जातात.  ग्रामदैवताची आपल्यावर कृपा दृष्टी राहावी या अपार श्रद्धेपोटी पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही चंदगड तालुक्यात जोपासली जात आहे.  पैशाची फिकीर न करता पै-पाहुणे, नातेवाईक, मित्र मंडळींना आमंत्रण देऊन मांसाहारी भोजनाचा आणि  मद्याचा यथेच्छ स्वाद घेतला जातो. यामध्ये जेवणावळी दोन दोन दिवस चालतात. कर्जबाजारी असलेलाही शेजारी करतोय म्हणून इर्षेला पडून आपल्या पाहुण्यांना काही कमी पडू देत नाही. सर्वच यात्रांचा हिशोब काढला तर दरवर्षी तालूक्यातील यात्रावर पाच कोटी हून अधिक रूपये खर्च होतात.

      यावर्षी कोरोनाने कोट्यावधी रुपये वाचवले आहेत. मटण व चिकनची पन्नास टक्य्याहून कमी झाली. यावर्षी यात्रा होणार म्हणून तालुक्यातील दुकानदारांनी लाखो रुपयांचा माल विक्रीसाठी सज्ज ठेवला होता. तसेच कपडे व्यापारी, किराणा,  खेळणी,  पाळणे, हॉटेल व्यावसाईकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. यात्रा रद्द झाल्याचा अधिक फायदा यात्रा न  करणाऱ्यानाच होणार आहे. 

                या गावांच्या यात्रा रद्द 

       तालुक्यातील  दि. २६ रोजी बागिलगे येथे होणारी ८ गावांची रवळनाथाची यात्रा रद्द झाली आहे. सूंडीची वाळकेश्वरची  दि. २७ रोजी होणारी बसर्गेच्या भावेश्वरी व काजिर्णेची माऊली देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. दि. २८ रोजी होणारी  जक्कुबाई  देवीची शिवणगे, लकीकट्टेची यात्रा,  दि. १ मार्च रोजी होणारी भावेश्वरी यात्रा मोदगा, दि. २ रोजी होणारी कडलगे खु. ची भावेश्वरी यात्रा, दि. ३- रोजी होणारी देव रवळनाथ आणि  ढोलगरवाडीची सातेरीदेवी, कामेवाडी, नरगट्टी, चिंचणे, कमलवाडीची मष्णाई, दि. ४ रोजी माणगांव, गौळवाडी ची सीमदेव, दि. ५ रोजी माणगाव हुलकाई देवी यात्रा,लाकूरवाडी ची काळूबाई,  चंदगड भावेश्वरी, सातेरी, कोकरे- भावेश्वरी,  दि. ६ - कोरजाईदेवीची कोरज, कुर्तनवाडी, कोनेवाडी, नागणवाडी, गंधर्वगड, पाटणे,  येथील यात्रा दि.  ७ - कडलगे बु., शेवाळे, जेलुगडे, जंगमहट्टीची यात्रा, दि.८ -  काळामावाडी, गुडवळे, हलकर्णी, इनाम कोळीद्रे, तुर्केवाडी, दि. ९ - मोटणवाडी, कळसगादे सदावरवाडी, शिप्पूर, दि. १० - नांदवडे माऊली व गवसे पावणाईदेवी, दि. १२ - बुजवडे भावेश्वरी, कानूर खु. मल्लनाथ,  ह्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय हेरे येथील माटेश्वराची व कोदाळी येथील माऊली देवीची यात्रा व तालुक्यातील इतर लहान गावाच्या ग्रामदैवतांच्या यात्रा ही रद्द करण्याच्या मनस्थितीत यात्रा कमिट्या आहेत. 

No comments:

Post a Comment