सातवणेतील "ते" धोकादायक वळण हटवण्याची गरज, प्रवाशांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2021

सातवणेतील "ते" धोकादायक वळण हटवण्याची गरज, प्रवाशांची मागणी

चंदगड-गडहिंग्लज मार्गावर असलेले हे धोकादायक वळण.

चंदगड / प्रतिनिधी

    नागणवाडी-गडहिंग्लज राज्यमार्गावर सातवणे (ता. चंदगड) गावानजिक  बस स्टॉप ते दत्त मंदिर या पाचशे मीटरचा रस्ता पूर्णता धोकादायक वळणाचा आहे. यावरुन येथून ये-जा करत असताना अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे हे वळण गारगोटी-अडकूर -दोडामार्ग रस्त्याचे नूतनीकरण करताना काढावे अशी मागणी ग्रामस्थां बरोबरच प्रवाशी वर्गातून केली जात आहे.   

         सातवणे दरम्यान चे हे वळण अत्यंत धोकादायक असून तीव्र उतरणीचे आहे. या ठिकाणी  अनेकदा ऊस वाहतूक करणा-या ट्रक, ट्रॅक्टर आदी वहानाना चढते वेळे अडचणींचा सामना करावा लागतो, वळणाचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. रस्त्या शेजारी घरे असल्याने अनेकदा रस्ता ओलंडताना नागरिकांचे अपघात झाले आहेत. या ठिकाणी रस्ता अरुंद  असलेने दोन वाहने पास होताना वादाचे प्रसंग उदभवले आहेत. याच ठिकाणी नाला असून या नाल्याची उंची वाढवण्याची गरज आहे. सध्या गारगोटी अडकुर चंदगड तिलारी दोडामार्ग या राज्य मार्गाचे काम सुरू आहे, त्यामुळे रस्ता करताना  धोकादायक वळण दुरुस्त करून सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रवाशी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
No comments:

Post a Comment