रस्त्यावर सापडलेले पैशांचे पॉकिट विद्यार्थ्यांकडून पोलिस स्टेशनमध्ये जमा, विद्यार्थ्यांचे कौतूक - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2021

रस्त्यावर सापडलेले पैशांचे पॉकिट विद्यार्थ्यांकडून पोलिस स्टेशनमध्ये जमा, विद्यार्थ्यांचे कौतूक

 

कु. सिद्धार्थ व रवि यांचा गौरव करताना सचिन कांबळे, रब्बानी मकानदार, राहूल धुपदाळे, प्राचार्य आर. आय. पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          पोलीस स्टेशन म्हटलं की लहान मुलांच्या मनात धडकी भरते. पण हेच पोलीस स्टेशन शोधत शोधत दि न्यू इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी पोलीस चौकीत गेले. ते पण रस्त्यावर सापडलेले पैशांचे पॉकिट जमा करायला विद्यार्थ्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      शाळा सुटल्यावर घरी जात असताना जुन्या स्टँडवर कु. सिद्धार्थ बाबू रेडेकर व रवि शांताराम मुळीक या इयत्ता आठवी `ब` च्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट सापडले. त्या पाकिटात 5000 रुपये पेक्षा जास्त रक्कम होती. तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, लायसन्स होती. पण या विद्यार्थ्यांनी पैशाला बळी न पडता ते पाकीट पोलीस ठाण्यात जमा केले. चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तळेकर यांनी ते पाकीट कोणाचे? याचा शोध घेतला घेऊन महालक्ष्मी ट्रॅव्हल्सचे ड्रायवर सुहास पाटील यांचेकडे सुपूर्त केले.

      महालक्ष्मी ट्रॅव्हलचे पदाधिकारी सचिन कांबळे, रब्बानी मदार, राहूल धुपदाळे यांनी शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू देऊन सत्कार केला. 'प्रामाणिकपणामुळे आपल्या व्यक्तीमत्वाला बहर येतो. आपल्या  जीवनात प्रामाणिकपणाचे फळ हमखास मिळते. यावर प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे." असे मत प्राचार्य आर. आय. पाटील यांनी मांडले. 

No comments:

Post a Comment