गुडेवाडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये निर्भया पथकाचे मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2021

गुडेवाडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये निर्भया पथकाचे मार्गदर्शन

निर्भया पथकाकडून धनश्री सावंत मार्गदर्शन करताना.

तेऊरवाडी (प्रतिनिधी)

      कोल्हापूर जिल्हा पोलीस दल अंतर्गत निर्भया पथकाने स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी (ता. चंदगड) येथे मार्गदर्शन केले.

       निर्भया पथकाचा आधार, बनवा जीवन आपले रुबाबदार, असे आवाहन हवालदार तानाजी पाटील यांनी केले. मुलींची छेडछाड करणे, सोशल मीडियावर त्रास देणे, मानसिक त्रास, भावनिक ब्लॅकमेल करणे अशा प्रकारचे वर्तन कोणी करत असल्यास निर्भया पथकास 9404912133 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस कॉन्स्टेबल धनश्री सावंत यांनी केले.

   यावेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रीतम सूर्यवंशी, बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक जी. व्ही. गावडे,  शालेय समिती, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. एल. पी. पाटील यांनी आभार मांनले.

No comments:

Post a Comment