![]() |
शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगांवकर यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार स्विकारताना आय.के. स्वामी |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
श्री छ. शिवाजी हायस्कूल माणगांव तालुका चंदगडचे मुख्याध्यापक आय. के. स्वामी यांना यंदाचा गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने देण्यात येणारा गुरूवर्य बी. जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार पुणे मतदार संघाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते देण्यात आला.
मुख्याध्यापक आय. के. स्वामी एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून सर्वांना परिचित आहेत. अध्यापन कौशल्याबरोबरच उत्कृष्ठ प्रशासनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परिक्षामध्ये यशस्वी झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बी. जी. काटे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री. पवार यांची प्रमुख उपस्थिती होते. या प्रसंगी श्री. छ. शिवाजी हायस्कूल माणगावचे सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment