नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. किरण विठ्ठल सुर्यवंशी यांना लहानपणापासूनच चित्रकलेच्या आवडीबरोबरच निसर्ग सौंदर्याची सखोल जाण आहे. यांच्या जोरावर व्यवसायाने डॉक्टर असूनही झाडावरून गळून पडलेली पाने, फुले आदी शुष्क नैसर्गिक गोष्टीच्या माध्यमातून डाॅ. किरण यांनी कॅनव्हासवर उतरवून कृत्रिम रंग, ब्रश यांचा वापर न करता साकारलेल्या वैश्विक दालन कलाकृती किरासू आर्ट कलाविष्काराचे आनावरण शिक्षण समिती कसबा नेसरीचे संचालक तथा माजी प्राचार्य विठठल सुर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
किरासू आर्ट www.Kirasuart.com वेबसाईटचे उद्घाटन गिरीश बारसकर यांच्या हस्ते झाले. किरासू आर्ट कलाविष्कारच्या माध्यमातून किरासू आर्ट लोगो, संगीतमय दृकश्राव्य रचना वेबसाईट, ३६० फोटोग्राफीचे दालन, आॅनलाईन चित्र प्रदर्शन लोकांसाठी खुले करण्यात आले.
लवकरच मोफत आॅनलाईन कोर्स सुरू होणार आहेत. यावेळी फिरोज शेख, ऐश्वर्य मालगावे, शैलेश बोंगाळे, अमोल शिंदे, सुनिल सुतार, बाळासाहेब परितकर, धनाजी सुतार, विजया सुर्यवंशी, पवन सुर्यवंशी, सतीश सावंत, रमण लोहार, नंदकुमार वाईंगडे, अनिल पाटील याच्यासह कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. डाॅ. मंगल सुर्यवंशी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment