![]() |
पाटणे वनविभागाच्या वतीने वन-वणवा प्रतिबंध सप्ताह साजरा केला. |
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने एक ते सात फेब्रुवारी वन-वणवा प्रतिबंध सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुषंगाने पाटणे रेंज मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये वन-वणवा किती घातक आहे. त्यामुळे जीवसृष्टीचे होणारे नुकसान वाढणारा मानव-वन्यजीव संघर्ष याबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. पाटणे वनपरिक्षेत्रातील टास्कसाठी कार्यशाळा आयोजित करून नवीन तंत्रज्ञानाचा साधनसामुग्रीचा वन वनवा रोखण्यासाठी होणारा वापर यावर चर्चासत्र व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले. ढेकोळी येथील छत्रपती शाहू हायस्कूल येथे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, पोलीस पाटील, सरपंच व वन विभागाच्या वतीने मार्गदर्शन व उपाय योजना यांविषयी चर्चा करण्यात आली. वनाचे प्रत्येक भागात गरजेच्या ठिकाणी वन हद्दीचे जाळरेषा काढण्यात आल्या.स्थानिक ग्रामस्थ, गुराखी, निवासी व प्रवासी यांनी वणावा लावू नये. सर्वात जास्त वनाची हानी ही वणव्यामुळे होत असते. त्यामुळे जाणीवपूर्वक लावताना कोणी इसम मिळाल्यास त्यावर वन कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल असे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. वनपाल, वनरक्षक, मजूर, ग्रामस्थ व हायस्कूलचे विद्यार्थ्यी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment