गुरूकूल हौसिंग फायनान्सकडून एस. के. पाटील यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2021

गुरूकूल हौसिंग फायनान्सकडून एस. के. पाटील यांचा सत्कार

गुरूकूल हौसिंग फायनान्स कडून एस. के. पाटील यांचा सत्कार करताना चेअरमन पी. एम. ओऊळकर


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

         गुरूकूल हौसिंग फायनान्स लिमिटेड चंदगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. के. पाटील यांचा चेअरमन पी. एम. ओऊळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     इंग्रजी विषय शिक्षकाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने खूपच समाधान वाटत आहे. एक शिस्तप्रिय अभ्यासू व विद्यार्थिप्रिय शिक्षक याबरोबरच समाजासाठी पत्रकारीतेच्या माध्यमातून अहोरात्र काम करणारे श्री. पाटील यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे चंदगड तालूक्यातील इंग्रजी विषय शिक्षकांचा गौरव असल्याचे विचार चेअरमन पी. एम. ओऊळकर यानी व्यक्त केले. यावेळी एकनाथ पाटील, आर. एस. भोगण, आर. व्ही. चिंचणगी यांनी मनोगते व्यक्त कली. ए. पी.  नाईक, केदारी पाटील, सौ. लिला पाटील यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक आर. एस. भोगण यांनी केले तर आभार इ. एल. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment