![]() |
सुंडी येथील निवृत्त सुभेदार निवृत्ती पाटील यांचा गौरव करताना आमदार राजेश पाटील. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अविरत २८ वर्ष देशसेवा करणे सोपी गोष्ट नाही . सुंडी गावच्या सुपूत्राने चंदगच्या युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे . सात दहशतवाद्या ना कंठस्नान घालून सेनामेडल मिळवलेल्या सुभेदार निवृत्ती पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे विचार आमदार राजेश पाटील यानी व्यक्त केले .
सुंडी ग्रामस्थांचा वतीने सुभेदार निवृत्ती पाटील यांच्या निवृत्तीनिमित्य आयोजित सत्कार समारंभात आमदार पाटील बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झिमाणा पाटील होते .
यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सुभेदार निवृत्ती पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला . याबरोबरच सुंडी ग्रामस्थांचा वतीने मानपत्र देूवून सुभेदार पाटील यांचा गौरव करण्यात आला .
प्रा. मायाप्पा पाटील यानी सर्वांच्या अंगावर शहारे यईल असे मानपत्राचे वाचन करून सर्वसामान्य जनता स्वार्थ, सत्ता व संपत्ती साठी जगते मात्र सैनिक हे केवळ देशासाठी जगतात, आपण जगण्यासाठी धडपडतो तर सैनिक देशासाठी प्राण देण्यास सदैव तयार असतात असे विचार व्यक्त केले.
यावेळी चंदगडचे पोलिस निरीक्षक एस. बी. तळेकर, कॅप्टन दिपक शिर्के, हवालदार मायाप्पा यळूरकर आदिनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात नूतन ग्रामपंचायत सदस्य, सुभेदार पाटील यांच्या मातोश्री द्रौपदा पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी, सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment