रविकिरण पेपर मिल्सचे कामगार करणार गूरूवार पासून उपोषण, वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2021

रविकिरण पेपर मिल्सचे कामगार करणार गूरूवार पासून उपोषण, वाचा काय आहे कारण?

 निवेदन देताना कामगार


चंदगड / प्रतिनिधी

             गेले सहा महिने आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिल्स प्रा. ली.  या कारखान्यातील कामगार गूरूवार दि. १८ फेब्रुवारी पासून पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आमरण उपोषण करणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी,सहाय्यक कामगार आयुक्त  यांना देण्यात आले आहे.                      निवेदनात म्हटले आहे की कारखान्यात व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला महागाई भत्ता देत नव्हते . इतरही अनेक प्रश्न होते . परंतु व्यवस्थापनाने ते सोडवले नाहीत . त्यामुळे कामगार सर्व श्रमिक संघ या संघटनेचे सभासद झाले , संघटनेने अनेक पत्रे लिहिली व मागण्या केल्या पण व्यवस्थापनाने एकदाही चर्चा केली नाही ,संघटनेने कायदेशीर सर्व बाबींचे पालन करून नोटीस देऊन संप सुरु केला . आज संपाला ६ महिने झाले आहेत . दरम्यान सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांनी या कारखान्याला भेट दिली असता या कारखान्यात वेतन देण्याचा कायदा , किमान वेतनाचा कायदा , कंत्राटी कामगार कायदा व अमरराज्य प्रवासी मजदूर कायदा याची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसले ,याबाबत व्यवस्थापनाने कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही , व्यवस्थापनाने खोटी कागदपत्रे तयार करून व कागदपत्रात हेराफेरी करून कंपनीच्या कामगारांना कंत्राटी कामगार दाखवले . याबाबत पोलीस तक्रार दाखल करीत आहोत , कंपनीने बनावट कंत्राटदार तयार करून कामगारांना काम नाही असे भासवून ४८ मराठी कामगारांना कामावरून कमी केले . त्याच वेळी उत्तर भारती कामगार भरून काम सुरु ठेवले मा न्यायमूर्ती , औद्योगिक न्यायालय यांनी संपकरी कामगारांच्या जागी दुसरे कामगार भरती करता येणार नाहीत ही असा आदेश दिला आहे . त्याची पायमल्ली केली आहे हे देखील मा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे . मालकावर याबाबत न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे . या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी यांचे उपस्थितीत तहसीलदार चंदगड यांनी संबंधितांची 2/3 कामगारांचे प्रतिनिधी हजर होते . पण व्यवस्थापन गैरहजर राहिले , या सभेत ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या नियमाचे उल्लंघन व्यवस्थापन करत आहे हा प्रश्न संघटनेने उपस्थित केला , ६ महिन्याच्या संपानंतर कामगार व्यवस्थापनाच्या बेकायदेशीर व अडेल भूमिकेबाबत नाराज आहेत . तसेच शासकीय यंत्रणेला व स्थानिक नेतृत्वाला सुद्धा न जुमानण्याच्या भूमिकेमुळे संतापले आहेत , बिहारी कामगारा बाबत सर्व कायदे मोडून व्यवस्थापन त्यांची अमानुष पिळकवणूक करीत आहे हे देखील मा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या तपासणीतून समोर आले आहे , रोजगार मिळावा यासाठी स्थानिक शेतक - यांनी एमआयडीसी ला जमिनी दिल्या . परंतु स्थानिकांना रोजगार देण्याच्या शासन निर्णय कंपनी व्यवस्थापनाने पायदळी तुडवला आहे ,या सर्व परिस्थितीमुळे भागात असंतोष पसरला आहे . यातून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झाले तर बेजबाबदार व्यवस्थापनाला जबाबदार धरावे लागेल.असे निवेदनात  म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर जोतिबा जोशीलकर,कल्मेश्वर कांबळे, परशराम हूदंळेकर,विठ्ठल गावडे,नंदकुमार गावडे,मनोहर नांदवडेकर, आनंद भोसले, रामनाथ भोसले, ज्ञानेश्वर गावडे,नामदेव चव्हाण आदीसह कामगारांच्या स्वाक्ष-या आहेत.No comments:

Post a Comment