मौजे सातवणे येथे मृद आरोग्य पत्रिका अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2021

मौजे सातवणे येथे मृद आरोग्य पत्रिका अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

सातवणे येथे शेतकरी प्रशिक्षणास मार्गदर्शन करताना अधिकारी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान व मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मौजे सातवणे येथे प्रगतशील शेतकरी रामभाऊ पारसे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय पालसांदे मृदा शास्त्रज्ञ व यशवंत मुठाळ शास्त्रज्ञ उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे उपस्थित होते. विजय पालसांदे मार्गदर्शन करताना जमिनीचे आरोग्य, माती परीक्षण, एकात्मिक खत व्यवस्थापन ,रासायनिक, जैविक खत वापरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.पुढील पिढीसाठी सुपीक जमीन देण्यासाठी जमिनीची योग्य निगा व खत व्यवस्थापन कसे करावे व हिरवळीच्या खताचा वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यशवंत मुठाळ यांनी काजू लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक खत, कीड-रोग व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.काजू वर येणाऱ्या कीड व रोगांची रोगांची  ओळख  व नियंत्रण  कसे करता येईल याबाबत माहिती दिली. काजू मोहोर संरक्षण करण्याबाबत  माहिती दिली.

             रामभाऊ पारसे  यांनी अध्यक्षनिय भाषण बोलताना आपली जमीन पुढील पिढीसाठी सुपीक देण्यासाठी आत्तापासूनच जमिनीची योग्य ती काळजी घेतली पाहिजे व सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करून जमिनीचा कर्ब वाढवला पाहिजे व जमिनीची सुपीकता वाढवली पाहिजेत असे सांगितले.

          मंडळ कृषी अधिकारी यशोदीप पोळ यांनी मृद आरोग्य पत्रिका कार्यक्रम बाबत माहिती दिली . माती हे वनस्पतीच्या वाढीसाठी अन्नद्रव्याचा पुरवठा करणारे सजीव व नैसर्गिक माध्यम आहे.खनिज,सेंद्रिय घटक, पाणी आणि हवा हे जमिनीचे प्रमुख घटक असून पीक वाढीसाठी या घटकाचे प्रमाण एकत्र असते.जमिनीचा अभ्यास आणि वर्गीकरण यांच्या उपयोगीतेनुसार केला जातो. नैसर्गिक साधन सामुग्रीचे व्यवस्थापना करिता मृदा सर्वेक्षण केले जाते आणि मृदा  परीक्षण हा खतांचा संतुलित वापर आणि व्यवस्थापन याची माहिती दिली.

           या कार्यक्रमास कृषि सहाय्यक बसवराज वाडकर, रत्नमाला वाडेकर अतुल पवार, अक्षय भोरखडे, खंडू साबळे, सुप्रिया कोल्‍हे ,दिगंबर सूर्यवंशी, गणेश गायकवाड,अभिजीत दावणे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व  शेतकरी हजर होते.आभार प्रदर्शन प्रल्हाद केंद्रे कृषी सहाय्यक (सातवणे ) यांनी केले.

No comments:

Post a Comment