कोवाड-कागणी मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले? वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2021

कोवाड-कागणी मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले? वाचा काय आहे कारण?

कोवाड-कागणी मार्गावर पडलेले हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

      चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्त्वाच्या कोवाड ते कागणी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. संबंधित बांधकाम विभागाने डांबरीकरणाने रस्ता पॅचवर्क करावा अशी मागणी वाहनधारक व प्रवासातून वाढली आहे.

   आजरा, गडहिंग्लज, नेसरी विभागाला बेळगावची तसेच चंदगड, ढोलगरवाडी, माणगाव परिसराला कालकुंद्री, कुदनुर, राजगोळी, दड्डी व हत्तरगी राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा आणि एकमेव रस्ता आहे. एसटी बस सह रोज हजारो वाहने येथून ये-जा करतात. पूर्ण रस्ता सुस्थितीत असल्यामुळे येथून वाहने सुसाट वेगाने धावत असतात तथापि ठीक-ठिकाणी पडलेले खड्डे अचानक पणे येत असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. अपघातांचा संभव वाढला आहे त्यामुळे दुरुस्तीसाठी तातडीची उपाययोजना करावी. अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment