कोल्हापूर भाजप ओबीसी आघाडीच्या उपाध्यक्षपदी संगम नेसरीकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2021

कोल्हापूर भाजप ओबीसी आघाडीच्या उपाध्यक्षपदी संगम नेसरीकर यांची निवड

संगम नेसरीकर

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

      भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ओबीसी आघाडीच्या उपाध्यक्षपदी चंदगड येथील श्री संगम मल्लेश नेसरीकर यांची निवड करण्यात आली. 

          भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडवून पक्ष विस्ताराचे काम करावे. अशा अपेक्षेने पक्ष वाढीसाठी सशक्त संघटन करण्यासाठी म्हणून भारत मारुती गुरव (जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी) यांनी नियुक्ती पत्र दिले.

ओबीसी जिल्हा कार्यकारिणी नियुक्ती कार्यक्रमास समरजितसिंह घाटगे (अध्यक्ष भा. ज. पा. जिल्हा कार्यकारणी), चंद्रकांतदादा पाटील (आमदार विरोधीपक्ष नेते भा. ज. पा), विठ्ठल पाटील (सरचिटणीस भा. ज. पा जिल्हा कार्यकारणी), सुरेश हाळवणकर (माजी आमदार, प्रदेशउपाध्यक्ष इचलकरंजी मतदार संघ), मकरंददादा देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र प्रमुख),  हेमंत कोलेकर (उपाध्यक्ष भा. ज. पा जिल्हा कार्यकारणी), नाथाजी पाटील  (संघटन मंत्री भा. ज. पा जिल्हा) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारणी निवड करण्यात आली.No comments:

Post a Comment