कोवाड व माणगाव केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2021

कोवाड व माणगाव केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न

कोवाड : सी एल वृत्तसेवा 

         शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगड अंतर्गत कोवाड व माणगाव केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची ऑनलाइन सहविचार सभा, शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. 

         गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोवाड केंद्र समन्वयक विलास शंकर पाटील व ए. के. पाटील यांनी परिषदेचे नियोजन केले. परिषदेत उपस्थित शिक्षकांना व्यवसायिक शिक्षण, सर्व समावेशित शिक्षण, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षक व शिक्षकांचे शिक्षण, शालेय नेतृत्व व सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण, शाळा समूह आणि स्थानिक प्रशासन, माहिती तंत्रज्ञान आणि नेतृत्व, प्रारंभिक बल्यावस्था निगा आणि शिक्षण 

आदी विषयांवर वाय. व्ही. कांबळे प्राचार्य श्रीराम विद्यालय, शाहू पाटील, सागर खाडे, दयानंद पवार, पुंडलिक इंगवले, विजय पाटील, संतोष सुर्यवंशी, आप्पाराव पाटील, प्रमिला कुंभार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केंद्र प्रमुख डी आय पाटील यांनी केले, आभार ए के पाटील यांनी मानले‌. परिषदेस कोवाड केंद्रमुख्याध्यापक श्रीकांत पाटील, माणगाव केंद्रमुख्याध्यापक एन व्ही पाटील आदींसह प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची उपस्थिती होती.




No comments:

Post a Comment