कोवाड येथे नॅचरल फार्मस शेती सेवा केंद्राचे उदघाटन - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2021

कोवाड येथे नॅचरल फार्मस शेती सेवा केंद्राचे उदघाटन

नॅचरल फार्मस् च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना वाय. बी. पाटील, व्यासपीठावर मान्यवर.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          नाबार्ड आणि एम. सी.डी. सी.पुरस्कृत खते,बी-बियाणे कीटक नाशक व शेती साहित्य वितरण केंद्राचा उदघाटन सोहळा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नामदेव वाकुरे, जिल्ह्या उपनिबंधक अमर शिंदे व चंदगड तालुका कृषि अधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते पार पडला.

उपस्थित शेतकरी

           भरमु पाटील,भावकू गुरव व संभाजी शहापुरकर यांच्या पुढाकाराने कोवाड येथे किणी बस स्टॉप या ठिकाणी सदर  केंद्र सुरू करण्यात आले आहे.

         प्रथमतः कार्यालयाचे उदघाटन जिल्ह्या अधीक्षक कृषि अधिकारी नामदेव वाकुरे यांच्या हस्ते करण्यात आले.याठिकाणी मांडण्यात आलेल्या फळे व भाजीपाला स्टोल चा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

           शिव प्रतिमा पूजनाने झालेल्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष वाय बी पाटील यांच्या सह सर्व मान्यवरांची मनोगते झाली.यावेळी भागातील सर्व शेतकऱ्यांनी सदर शेती सेवा केंद्राचा लाभ घेऊन आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना फायदेशीर शेती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

       यावेळी संदीप शहापुरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी नॅ चरल फार्मस, के. एस. ठाकरे सह उपनिबंधक,आशिष चव्हाण प्रकाश शेळके,प्रवीण गजदीश्वर,यशोदीप पोळ,अक्षय गार्डे मंडळ कृषि अधिकारी,शिल्पा इंगवले,अभिजित दानवे,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,चंदगड, तसेच कृषी सहायक सुधाकर मूळे, अतुल मूळे, पूजा जाधव,अतिष चव्हाण,जी आर गवाळे, नामदेव पवार, जनार्दन देसाई,नरसु बचुळकर, संजय कुटरे व भागातील सर्व शेतकरी गटांचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment