![]() |
सौ. छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. छाया राजाराम जोशी यांची तर उपसरपंचपदी संभाजी राणबा पाटील यांची निवड झाली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील व दौलतचे माजी संचालक अशोक रामू पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री. कलमेश्वर ग्रामविकास पॅनेलने ११ पैकी ७ जागा जिंकून सत्ता काबीज केली होती.
या पॅनलचे सौ छाया जोशी व संभाजी पाटील यांच्यासह विलास वसंत शेठजी, अझरुद्दीन मेहबूब शेख, प्रशांत भावकु मुतकेकर, स्वागता सुनील कदम, गीता शिवाजी नाईक विजय झाले होते. तर विरोधी आमदार राजेश पाटील यांच्या पॅनेलचे गायत्री जोतिबा पाटील, गीता अनंत पाटील, विजया विनायक कांबळे, विठोबा सिताराम पाटील हे चार उमेदवार विजयी झाले होते.सरपंचपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी आरक्षित असल्यामुळे जोशी यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या गुप्त मतदानात संभाजी पाटील ७ विरुद्ध ४ मतांनी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. डी. खोत (कनिष्ठ अभियंता बांधकाम) व अशोक पाटील (ग्राम विकास अधिकारी तुर्केवाडी) यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment