तडशिनहाळ येथील रस्ते विकास कामाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2021

तडशिनहाळ येथील रस्ते विकास कामाचा शुभारंभ

तडशीनहाळ येथे कामाचा शुभारंभ


 चंदगड / प्रतिनिधी

          तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे जि. प. सदस्या सौ. विद्याताई विलास पाटील यांनी आपल्या फंडातून तडशिनहाळ येथील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणेसाठी दहा लाख रु. चा निधी उपलब्ध करून दिला असल्याने या  गावच्या विकासासाठी मदत झाली.  तुर्केवाडी मतदार संघात सध्या सौ. विद्याताई विलास पाटील यांच्या प्रयत्नातून गावात रस्ता होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 

         तुडये मतदार संघातून निवडणूक लढवलेल्या विद्याताई यांनी सर्वच मतदार संघाचा विकासकामी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पाण्णा भोगन यांनी व्यक्त केले. 

           कार्यक्रमात बोलताना भोगन पुढे म्हणाले, गावातील आणखी कोणती कामे अपुरी असतील तर आमच्याकडे प्रस्ताव करून मागणी करा आम्ही ती पूर्ण करू असे सांगितले. तर आपल्या मनोगतात विलास पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू असे सांगितले.

        यावेळी कार्यक्रमाला तडशिनहाळच्या  सरपंच सौ सुजाता कदम, उप सरपंच रामलिंग गुरव, माजी सरपंच अप्पाजी करडे, तं. मु. अध्यक्ष नारायण दळवी, ग.  कंत्राटदार बसवंत अडकूरकर, दत्तू पाटील, देवाप्पा करडे, तसेच मनोहर कांबळे, एकनाथ कदम, विष्णू कदम, मारुती हेरेकर, परशराम कांबळे, रामू  बोलके, महादेव कांबळे,जाणीता फर्नाडीस, साक्षी बिर्जे, भालचंद्र पाटील, शंकर बोलके, सुधाकर कदम, कृष्णा दरेकर, संजय नेवगिरे,  पुंडलिक बोलके, प्रकाश कदम, बाळू करडे,  संतराम कांबळे, रणब साळुंखे, शंकर पाटील सुपे, रामू सुतार, ज्ञानेश्वर दळवी, महादेव दरेकर, तानाजी नाईक सर, दिलीप बिर्जे, पुंडलिक कांबळे व इतर ग्रामस्थ कार्यक्रमाला हजर होते.

No comments:

Post a Comment