कोलिक येथे माध्यमिक शिक्षकाने दिले धामण सापाला जीवदान - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2021

कोलिक येथे माध्यमिक शिक्षकाने दिले धामण सापाला जीवदान


जखमी धामण सर्पावर उपचार करताना मुख्याध्यापक गुलाब पाटील

तेऊरवाडी  / सी. एल. वृत्तसेवा

      शालेय परिसरात आलेल्या जखमी धामण (धिवड) सर्पाला श्री सातेरी विद्यालय कोलिकच्या माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक गुलाब पाटील यांनी प्रथोमोपचार करून जंगलात सोडून दिले.

       चंदगडला वन्य प्राण्यांची कमतरता नाही. त्यामध्ये जर  कोलिक सारखा अति दुर्गम भाग असेल तर मग सर्वच प्राणी, पशू पक्षी पहायला मिळतात. आज दुपारी असाच एक भला मोठा धामण जातीचा सर्प अर्जुन गावडे यांच्या घराशेजारी लाकडामध्ये जखमी अवस्थेत निपचित पडलेला मुख्याध्यापक गुलाब पाटील एका आजीने सांगीतला. तस बघीतल तर सर्प बधितला तर अनेकांची पाचावर धारण बसते. एक तर सर्प बघीतला तर लोक पळून जातात नाहीतर त्याला मारायचा प्रयत्न करतात. पण पाटील सरांनी या सर्वाला छेद देत त्या सर्पाचे बारकाईने निरीक्षण केले. यावेळी तो धामण सर्प जखमी झाल्याचे लक्षात आले. या सर्पावर प्राथमिक उपचार करून सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. यावेळी ए .जी. वरपे, बाळू नाईक, उत्तम पाटील, ए. एस. सावंत व गावडू पाटील यानी मदत केली. प्राणीमात्रावर दया दाखवणाऱ्या गुलाब पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment