कागणी हायस्कूलचे शिक्षक जी. आर. कांबळे यांना गुणगौरव पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2021

कागणी हायस्कूलचे शिक्षक जी. आर. कांबळे यांना गुणगौरव पुरस्कार

 

कोल्हापूर : जी. आर. कांबळे यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

जीवन शिक्षण मंडळ पाटणे संचलित व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालयचे मराठी विषयाचे सहाय्यक शिक्षक गोपाळ राणबा उर्फ जी. आर. कांबळे यांना कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे कोजिम प्रेरणा व गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 दि. 21 रोजी कोल्हापूर येथे दसरा चौक, शाहू स्मारक भवनमध्ये हा सत्कार समारंभ झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आय. शेख व प्रमुख अतिथी डॉ. जी. पी. माळी, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते त्यांना मानपत्र गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जी. आर. कांबळे यांना प्रगत महाराष्ट्र फेलोशिप पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची तीस वर्षे सेवा झाली असून पुनर्रचित अभ्यासक्रमाला साधन व्यक्ती म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक उत्कृष्ट वक्तृत्वपट्टू घडवलेले आहेत. त्यांना चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवी पाटील, उपाध्यक्ष महादेव शिवणगेकर, सचिव सुतार, बी. एन. पाटील, संजय साबळे यांची प्रेरणा लाभली. जीवन शिक्षण मंडळ पाटणेचे अध्यक्ष एस. आर. पाटील, सचिव एम. ए. हागिदळे व सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक ए. जे. देसाई, गुंडकल एस. आर., जाधव डी. एम., हागिदळे मॅडम यांचे सहकार्य लाभले.





No comments:

Post a Comment