चंदगड मराठी अध्यापक संघामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2021

चंदगड मराठी अध्यापक संघामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन

                              

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         मराठी संस्कृती, मराठी भाषेच्या प्रेमापोटी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने तालुकास्तरीय घोषवाक्य, काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

        ही स्पर्धा पहिली ते पाचवीसाठी घोषवाक्य स्पर्धा, सहावी ते आठवीसाठी स्वरचित कविता व नववी ते दहावीसाठी कथालेखन स्पर्धा अशा तीन गटात होणार आहे.

       तिन्ही गटातील पहिल्या पाच क्रमांकांना संघामार्फत मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेबुवारी २०२१ रोजी गौरविण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत आपले साहित्य पाठवून द्यावे असे आवाहन संघाचे सचिव एस. पी. पाटील, रविंद्र पाटील, एच. आर. पाऊसकर यांनी केले आहे.No comments:

Post a Comment