चंदगड तालुक्यातील सर्वांत मोठी आठ गावांच्या यात्रा रद्द, कोणती आहे ही यात्रा? वाचा सविस्तर.......... - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2021

चंदगड तालुक्यातील सर्वांत मोठी आठ गावांच्या यात्रा रद्द, कोणती आहे ही यात्रा? वाचा सविस्तर..........कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      बागिलगे (ता. चंदगड) या गावासह डुक्‍करवाडी, धुमडेवाडी, तांबुळवाडी, गुडेवाडी, नरेवाडी, मजर जट्टेवाडी, मौजे जट्टेवाडी या आठ गावांची शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी नियोजित रवळनाथ यात्रा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली.              
          बागिलगे येथे झालेल्या देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बागिलगेसह डुक्‍करवाडी, धुमडेवाडी, तांबुळवाडी, नरेवाडी, जट्टेवाडी बुद्रुक, जट्टेवाडी खुर्द या सात गावांची यात्रा दरवर्षी एकाच दिवशी भरते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती सातही गावच्या सरपंच तसेच देवस्थान समित्यांना देण्यात आली आहे. शुक्रवार दि. 26 रोजी रोजी केवळ दहा मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरातील धार्मिक विधी व विधीवत पूजन कार्यक्रम होईल. यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात तसेच आपापल्या गावी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


1 comment:

Post a Comment