पंढरपुरला अस्थी विसर्जनला जातेवेळी झालेल्या भीषण अपघातात चंदगड तालुक्यातील चालकासह पाच ठार व अकरा जखमी, गावावर शोककळा - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2021

पंढरपुरला अस्थी विसर्जनला जातेवेळी झालेल्या भीषण अपघातात चंदगड तालुक्यातील चालकासह पाच ठार व अकरा जखमी, गावावर शोककळा

अपघातात चक्काचूर झालेली बोलेरो.

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

         वडीलांच्या अस्थी सोडण्यासाठी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत सोडण्यासाठी जात असताना पंढरपूर व सांगोला दरम्यान रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला बोलेरोची जोराची धडक बसल्याने  भीषण अपघात झाला. यामध्ये चालकासह पाच जण ठार झाले. यामध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगी अशा पाच जणांच जागीच मृत्यू झाला असून अकरा जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. तर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

         आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात हा भिषण अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील ही दुःखद घटना असून या अपघातामधे एकूण पाच जण ठार झाले असून अकरा जण जखमी आहेत. या म्रुत व्यक्तीमधे दोन पुरुष, दोन महिला व लहान मुलगी यांचा समावेश आहे. सखाराम धोंडीबा लांबोर (वय65), सुनीता जानू लांबोर (वय-11), साऊबाई लक्ष्मण लांबोर (वय-50, रा. धामणे, ता. जि. बेळगाव), नामुबाई काळू लांबोर, तुकाराम खंडू कदम ही मयत प्रवाशांची नावे आहेत. हे सर्व प्रवाशी कोदाळी येथील बाद्राई कडवळे गावचे आहेत.

           मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील १६भाविक बोलेरो गाडीतून मयत जानू लांबोर यांच्या अस्थी विसर्जनासाठी पंढरपूरला चालले होते. दरम्यान, पंढरपूर जवळच कासेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता, की बोलेरोची समोरची बाजू पूर्णपणे चपली असून गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. 

          अपघातातील ११ जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. त्यामध्ये धोंडीबा बापू लांबोर (वय 87), कोंडदेवा बापू लांबोर (वय 7), कोमल बापू लांबोर (वय 7), बबन लांबोर (वय 45), भारती बापू लांबोर (वय 54), रोहित यशवंत कांबळे (वय 20), बापू काळअप्पा लांबोर (45), कोंडीबा विठ्ठल लांबोर (वय 5), काळूलाल लांबोर (वय 70), नागूबाई ज्ञानू कोकरे (वय 50), धोंडीबा सखाराम डोईफोडे (वय 60) यांचा समावेश आहे.




No comments:

Post a Comment