![]() |
पाणंद रस्ते संग्रहित छायाचित्र. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या संकल्पना व प्रेरणेतून महसूल लोकजत्रा अंतर्गत चंदगड तालुक्यातील ६ महसूल मंडळातील ५८ गावातून ४० किलोमीटर अंतर असलेल्या अतिक्रमण झालेल्या ८२ पाणंदी बुधवार १७ फेब्रुवारी २०२१ रोजी मोकळा श्वास घेणार आहेत.
४० किलोमीटर लांबीचे हे पाणंद रस्ते खुले झाल्यानंतर ५ हजार ३०० शेतकऱ्यांना या वरून वाहतूक सुलभ होणार आहे. या सर्व पाणंदी एकाच दिवशी खुल्या केल्या जाणार असून दुर्गम भागातील कामाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. तालुक्यातील शेती उद्योगाला नवा आयाम प्राप्त करून देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन गडहिंग्लज प्रांताधिकारी विजया पांगारकर, चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले आहे. महसूल प्रशासनाने गेल्या दोन वर्षात चंदगड मधील १५१ पानंद रस्ते अतिक्रमणमुक्त केले आहेत. पाणंद रस्ते खुले करताना गावातील पदाधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचा सहभाग राहणार आहे. याबाबत संपूर्ण आराखडा तयार असून प्रशासन प्रशासनाची तयारी झाली असल्याचे तहसीलदार रणवरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment