पंढरपूर अपघातातील जखमी बबन लांबोर यांचा मृत्यू, मयतांची संख्या सहा - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2021

पंढरपूर अपघातातील जखमी बबन लांबोर यांचा मृत्यू, मयतांची संख्या सहा

बबन लांबोर

चंदगड / प्रतिनिधी 

         चंदगड तालुक्यातील बांदराई धनगरवाडा येथील जानू काळु लांबोर यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत सोडण्यासाठी जात असताना पहाटे पाच वाजता  पंढरपूर-सांगोला दरम्यान  कासेगाव नजिक समर्थ हाॅटेल समोर बोलोरो गाडीला झालेल्या अपघातात चालकासह  दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा अशा पांच जणांच जागीच मृत्यू झाला होता. तर अकरा जण जखमी झाले. त्या जखमी पैकी सोलापूर येथे शासकीय रूग्णालयात उपचार सूरू असताना बबन काळू लांबोर यांचा रात्री दिड वाजता मृत्यू झाला. तर अपघातातील जखमींना सोलापूरहून कोल्हापूर येथील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

          अपघातात सखाराम धोंडीबा लांबोर (60 वर्षे), पिंकी उर्फ  सुनीता जानू लांबोर(वय 11), नागूबाई जानू लांबोर,(सर्व रा.कोदाळी पैकी बांदराई वाडा,ता.चंदगड) शारूबाई लक्ष्मण लांबोर (50)(रा.धामणे ता.जि.बेळगाव) , व चालक तुकाराम गुंडू कदम( रा.कलिवडे ता.चंदगड)हे पाच जण जागीच ठार झाले होते. तर अपघातातील ११ जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. त्यामध्ये धोंडीबा बापू लांबोर (वय 87), कोंडदेव बापू लांबोर (वय 7), कोमल बापू लांबोर (वय 7),भारती बापू लांबोर (वय 54), रोहित यशवंत कांबळे (वय 20), बापू काळअप्पा लांबोर (45), कोंडीबा विठ्ठल लांबोर (वय 5), काळूलाल लांबोर (वय 70), नागूबाई ज्ञानू कोकरे (वय 50), धोंडीबा सखाराम डोईफोडे (वय 60) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी ना सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बबन लांबोर याचा मृत्यू झाला. दरम्यान काल खाजगी शववाहिकेतून मयतांचे मृतदेह कलिवडे, बांदराई धनगरवाडा, व धामणे धनगरवाडा येथे आणुन अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश ह्दय पिटाळून टाकणारा होता. धनगरवाड्यावर शोककळा पसरली होती. 

No comments:

Post a Comment