![]() |
तज्ञ संचालकांचे निवडीबद्दल अभिनंदन करताना रमेश हुद्दार, शिवाजी पाटील,भरमू तारीहाळकर आदी. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
श्री देव वैजनाथ प्राथमिक शिक्षक पतसंस्था चंदगड, सभासदांना साडे दहा टक्के दराने २५ लाखापर्यंत कर्ज देणार असल्याची घोषणा चेअरमन भरमू तारीहाळकर यांनी केली. ते कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन चौथ्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सलग चौथ्या वर्षी सभासदांना १४ टक्के लाभांश देत संचालक मंडळाने आदर्शवत कामगिरी केली आहे. पाच कोटींच्या ठेवी असून पाच कोटी कर्ज वाटप केले आहे. यावेळी तज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल जकणू पाटील, वसंत एटले, भरमाणा मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला.
सभेस वसंत जोशिलकर, रमेश हुद्दार, शिक्षक बँक संचालक शिवाजी पाटील, दस्तगीर उस्ताद, शाहू पाटील, परसराम नाईक, सदानंद पाटील, टी जे पाटील, अशोक नौकुडकर, अशोक भोईटे, रामचंद्र मोटूरे, शिवाजी चाळूचे, व्हाईस चेअरमन आनंद मोटर, सटूप्पा फडके, पा रा पाटील, विलास पाटील, प्रकाश पाटील, मोहन सुतार, अर्जुन चाळूचे, अनंत धोत्रे, महादेव व्हंकळी, निर्मला सावंत, सुरेखा पाटील उपस्थित होते. संस्था मॅनेजर पुंडलिक पाटील, नलिनी नौकुडकर यांनी सभा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment