एल्गार जनरल कामगार संघटनेच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी दशरथ कांबळे तर उपाध्यक्षपदी ज्ञानोबा कांबळे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2021

एल्गार जनरल कामगार संघटनेच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी दशरथ कांबळे तर उपाध्यक्षपदी ज्ञानोबा कांबळे यांची निवड

दशरथ कांबळे                       ज्ञानोबा कांबळे

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड तालुका एल्गार जनरल कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी जेलुगडे (ता. चंदगड) येथील राजयुवा प्रतिष्ठान (काव्यकुटूंब) समूहाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख दशरथ कांबळे यांची निवड करण्यात आली.  उपाध्यक्षपदी ज्ञानोबा कांबळे (नांदवडे), सचिव परशराम डोंबले, खजिनदार नारायण पाटील (शेवाळे), कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे (पाटणे), तालुका संघटक रामचंद्र तावडे (सदावरवाडी) यांची निवड करण्यात आली.

      एल्गार जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांचा संघटित व असंघटित बांधकाम कामगार व इतर कामगार मार्गदर्शन मेळावा व चंदगड तालुका एल्गार जनरल कामगार संघटनेचा उद्घाटन सोहळा सर्जेराव (भाऊ) कांबळे (संस्थापक अध्यक्ष एल्गार जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य) व एस. टी. धम्मदिक्षित पश्चिम महाराष्ट्र संघटक यांच्या उपस्थितीत हॉटेल गोविंदा पॅलेस हलकर्णी फाटा येथे आज उत्साहात पार पडला.

यावेळी सर्व संघटित, असंघटित बांधकाम कामगार व इतर कामगारांना संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुक्यातील कामगार उपस्थित होते.
No comments:

Post a Comment