रविकिरचा प्रश न सुटल्यास चंदगड बंदचा इशारा, अन्यथा शुक्रवारी पाटणे फाटा यर्थे रास्ता रोको - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2021

रविकिरचा प्रश न सुटल्यास चंदगड बंदचा इशारा, अन्यथा शुक्रवारी पाटणे फाटा यर्थे रास्ता रोको

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे रविकिरण पेपर मिल्सच्या कामगार आंदोलनाल भेट देऊन चर्चा करताना पदाधिकारी

चंदगड / प्रतिनिधी 

     हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीत सूरू असलेल्या  रविकिरण पेपर मिल्सच्या आंदोलनामध्ये जर तोडगा निघाला नाही. तर  शुक्रवारी चंदगड बंदचा इशारा सर्व श्रमिक संघाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच पाटणे फाटा येथे रास्तारोको करणार असल्याचेही पत्रकातून प्रसिद्ध केले आहे.

      रविकिरण पेपर मिल्सने सर्व कामगारांना कंपनी कामगार म्हणून हजर करून घेतले पाहिजे. ८० टक्के स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे या मागण्यांबद्दल त्वरित चर्चा करून निर्णय घ्यावा अन्यथा शुक्रवारी चंदगड बंद तर पाटणे फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा सर्व श्रमिक संघाच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलन स्थळी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कामगार, संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राजू भोसले, गणपती पवार, सोमनाथ गावडे या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले त्यांच्या जागी अमृत बुवा, नरेंद्र गणाचारी हे उपोषणास बसले असून उपोषण पुढे सुरू ठेवले आहे.

        यावेळी  जि. प सदस्य कल्लापा भोगण, विद्या विलास पाटील, प. स. उपसभापती विठाबाई मुरकूटे, सरपंच शुभांगी मुरकुटे, राहुल गावडे, विष्णू  गावडे, गणपती पवार, प्रा.  एन. एस. पाटील, नरसु पाटील, जगन्नाथ हुलजी, अर्जुन कांबळे, तानाजी गडकरी, व्ही. एस. कार्वेकर, पांडुरंग जाधव, विठ्ठल पाटील, विलास नाईक, अनिल पाटील, नितीन पाटील, विठ्ठल पाटील, प्रताप डसके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment