शाळाबाह्य सर्वेक्षणासाठी हलकर्णी येथे शिक्षकांना प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2021

शाळाबाह्य सर्वेक्षणासाठी हलकर्णी येथे शिक्षकांना प्रशिक्षण

हलकर्णी येथे प्रशिक्षणास उपस्थित प्राथमिक माध्यमिक शिक्षक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        केंद्र शाळा हलकर्णी येथे शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांच्या सर्वेक्षण संबंधी प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. अध्यक्षस्थानी बीआरसी विषय तज्ञ सुनील पाटील होते. केंद्रप्रमुख वाय के चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

     स्वागत मुख्याध्यापक अशोक बेनके यांनी तर प्रास्ताविक सुभाष चांदीलकर यांनी केले. यावेळी हलकर्णी, तुडिये, नागणवाडी, मांडेदुर्ग या चार केंद्रातील ४३ प्राथमिक १५ माध्यमिक ३ इंग्रजी माध्यम शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. परिसरातील २७ गावांत दिनांक १ ते १० मार्च पर्यंत चालणाऱ्या विशेष सर्वेक्षण मोहिमेत गावातील कुटुंबांची सर्वसाधारण माहिती व ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळा शाळाबाह्य, स्थलांतरित होऊन गेलेल्या व स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांची माहिती संकलित केली जाणार आहे. या मोहिमेत सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व बालरक्षक यांचा सहभाग राहणार आहे. या कामी गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार व विस्ताराधिकारी एम टी कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक समिती तालुकाध्यक्ष धनाजी पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment