धामापूर येथील गव्याचा हल्यात शेतकरी जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2021

धामापूर येथील गव्याचा हल्यात शेतकरी जखमी

 

गवाच्या हल्ल्यात जखमी झालेले धामापूर येथील शेतकरी संतोष गावडे

चंदगड / प्रतिनिधी

          धामापूर (ता. चंदगड) येथील संतोष लक्ष्मण गावडे (वय -36) हे रात्री शेताकडे राखणीला जात असताना पाणंद रस्त्यावर अचानक गव्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले. जखमी गावडे यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र चंदगड येथे दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी  वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, वनपाल ए. डी. वाजे, वनरक्षक के. एस. पताडे यांनी  जाऊन घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. संतोष गावडे हे काल रात्री जेवण आटपून शेताकडे जात होते बाजार गोंड नावाच्या शेतात गावाने हल्ला केल्याने संतोष गावडे जखमी झाले आहेत. वन्यप्राण्यांमुळे शेती आणि शेतकरी सुरक्षित राहिला नाही. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment