सातवणे येथील अपघातात तूर्केवाडी येथील एकाचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2021

सातवणे येथील अपघातात तूर्केवाडी येथील एकाचे निधन

अश्विन उर्फ कुमार रामचंद्र सुतार

चंदगड / प्रतिनिधी

         नागनवाडी-गडहिंग्लज राजमार्गावर सातवणे (ता. चंदगड)  गावाजवळ शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्विन उर्फ कुमार रामचंद्र सुतार (वय वर्षे ४५, रा. तुर्केवाडी, ता.चंदगड) असे मृत यूवकांचे नाव आहे.

         अधिक माहिती अशी कि, ``अश्विन सुतार हे कामानिमित (एम.एच.- ०९ ईए ७५७६) या दूचाकीवरून अडकूरला जात असताना  वाटेत बैल अचानक आडवा आला. त्या बैलाला धडक देऊन समोरून येणाऱ्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. त्यात अश्विन च्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोक्याला मार लागला होता. अधिक उपचारासाठी सुतार गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सुतार यांच्या मोटरसायकलवर आणखी एक वाटसरू महिला बसली होती. ती सातवणे येथे आपल्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाला जात होती. त्या महिलेस किरकोळ दुखापती झाली आहे.
No comments:

Post a Comment