चंदगड तालुका संघामार्फत तूर्केवाडी येथे भात खरेदी केंद्र सूरू - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2021

चंदगड तालुका संघामार्फत तूर्केवाडी येथे भात खरेदी केंद्र सूरू

                                  चंदगड तालुका संघामार्फत तूर्केवाडी येथे भात खरेदी केंद्र सूरू करण्यात आले.


चंदगड / प्रतिनिधी 

       चंदगड तालुक्यातील शेतकरी बांधवाना व संघाच्या सभासदांना शासनाचे हमीभावाचा लाभ व्हावा या दृष्टीकोणातून शासन हमीभाव योजनेखाली गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुर्केवाडी (ता.चंदगड) येथील चंदगड तालुका शे.स.ख.वि.संघाचे गोडावूनमध्ये भात खरेदी केंद्र चालू करणेत आले आहे.

     शासनाचा हमीभाव रुपये १ हजार ८६८ प्रतिक्विटंल असून त्यास केंद्र शासनाचे रुपये ७०० अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असून ज्या शेतकऱ्यांना, सभासदांना या योजनेअंतर्गत भात विक्री करावयाचे आहे. त्यांनी सन २०२०-२१ चा भात नोंदणी असलेला ७/१२ व ८ अ चा उतारा, बँक पासबुक, मोबाईल नंबर, आधार कार्ड देवून आपले नांव चंदगड तालुका शेत. सह ख. वि. संघ लि.तुर्केवाडी, मुख्य कार्यालय यशवंतनगर येथे ऑनलाईन रजिस्टेशन करावे. त्यानंतर किती भात संबधित शेतकऱ्यांस विक्री करता येते. संघाचे व्यवस्थापक एस. वाय. पाटील, संचालक तानाजी गडकरी, नारायण कोकीतकर, परशराम बिर्जे, मारुती खांडेकर, कल्लाप्पा करडे, विठ्ठल अडकूरकर, रुक्माणा पाटील, शिवाजी तुपारे तसेच भागातील शेतकरी उपस्थित होते.No comments:

Post a Comment