सरकार कुणाचं आहे हे मनात न आणता काम करायची जिद्ध ठेवा - भरमूअण्णा पाटील, सुपे येथे ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2021

सरकार कुणाचं आहे हे मनात न आणता काम करायची जिद्ध ठेवा - भरमूअण्णा पाटील, सुपे येथे ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा सत्कार

सुपे (ता. चंदगड) येथे भाजपाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्यांच्या सत्कार प्रसंगी माजीमंत्री भरमुआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, सचिन बल्लाळ, नाथाजीराव पाटील, विठ्ठल पाटील आदी. 

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील पन्नास टक्के ग्रामपंचायतींवर आपल्या विचारांना मानणारे लोक निवडून आले आहेत. ही खरचं कौतुकाची बाब आहे. सरकार कुणाचं आहे हे मनात न आणता काम करायची जिद्ध ठेवा. तसेच कोण गेलं, कोण राहील याची चिंता आपण कधीच केली नाही. पक्ष, संघटना कोण सोडून गेले हे महत्त्वाचं नसत. गरीब कार्यकर्त्यांची संघटना ही सहजा-सहजी ढळणारी नाही. राजकारण एका व्यक्तीवर चालत नसतं. सरकार काम करणाऱ्यांच असतं. हिम्मत दाखविणाऱ्यानाच परमेश्वर ही मदत करतो. म्हणून जिद्द ठेवा व  काम करा तूमच्या प्रत्येक कामात खारीचा वाटा उचलू अशी ग्वाही माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी दिली. सुपे (ता. चंदगड) येथे आयोजित भाजप नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यानी केले. 

    भरमुआण्णा  पुढे म्हणाले, ``ग्रामपंचायत पातळीवरील राजकारणात आम्ही कधीही हस्तक्षेप केला नाही. तरीही झालेल्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आली. हे सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या निष्ठेच व प्रयत्नांच यश आहे.``

       यावेळी शिवाजीराव पाटील म्हणाले, ``विधानसभेतील पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता आणली हे शौर्य वाखाणण्याजोग आहे. सत्ता नाही म्हणून काम थांबणार नाही. एक हजार नोकऱ्या सध्या तयार आहेत. भाजप कार्यालयात तरुणांनी अर्ज जमा करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भाजप तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस नाथाजीराव पाटील, विठ्ठल पाटील सुनील काणेकर, रामभाऊ पारसे, अशोक पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी आपले विचार यावेळी मांडले. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन केलेल्या भाजपच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमास माजी सभापती शांताराम बापू पाटील, गोकुळचे संचालक दिपक पाटील, अंकुश गवस, दौलतचे माजी संचालक अशोक पाटील, शामराव बेनके, माजी सभापती बबन देसाई, मायाप्पा पाटील, दिलीप चंदगडकर, समृद्धी काणेकर, रत्नप्रभा देसाई, रवी बांदिवडेकर, उपसभापती मनीषा शिवणगेकर, माजी उपसभापती विठाबाई मुरकुटे, राम पाटील, नामदेव कांबळे, अशोक कदम, लक्ष्मण गावडे, सटूप्पा पेडणेकर, ड. विजय कडूकर, मोहन परब, धैर्यशील सावंत भोसले, भावकू गुरव, योगेश कुडतरकर, यशवंत सोनार, संगम नेसरीकर, स्वप्नाली बोकडे, पंकज तेलंग, सुरेश सातवणेकर, उदयकुमार देशपांडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन बी. आर. चिगरे यांनी केले. आभार सरपंच आर. जी. पाटील यांनी मानले. 

No comments:

Post a Comment