चंदगड तालुक्यात संजय गांधी योजनेची १०७ प्रकरणे मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2021

चंदगड तालुक्यात संजय गांधी योजनेची १०७ प्रकरणे मंजूर

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुका संजय गांधी योजना समितीमार्फत तहसिलदार कार्यालय चंदगड येथे आयोजित केलेल्या मासिक बैठकीत १०७ प्रकरणे मंजूर करण्यात आली. अध्यक्षस्थानी  प्रवीण वाटंगी होते.

       प्रारंभी उपस्थितीतांचे स्वागत  तहसीलदार लदार विनोद रणवरे  यांनी करून लाभार्थ्याना अनुदान वेळेत वाटप करावी. जमा केलेल्या अनुदानाबाबत बँक पासबुकमध्ये त्याबाबतच्या नोंदी वेळच्या वेळी कराव्यात, अपंग लाभार्थी यांना रांगेत न थांबवता, प्राधान्याने अनुदान वाटपाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना बँक अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीला कमिटीचे सदस्य  गुंडू  मेटकुपी, अशोक  मनवाडकर, सोमनाथ गवस, सलीम मोमीन, महादेव मंडलिक, दत्ता नाईक, प्रिती गवारी, शितल कट्टी उपस्थित होते. आभार नायब तहसिलदार संजय राजगोळे यांनी मानले.


 


No comments:

Post a Comment