![]() |
म्हाळेवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे ३० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. म्हाळेवाडी ते लक्कीकट्टे रस्त्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून रु. १५ लाख तसेच याच रस्त्यासाठी जि. प. सदस्य अरुण सुतार यांच्या फंडातून रु. १० लाख निधी मंजूर झाला आहे.
तसेच जि. प. सदस्य कल्लापा भोगण यांच्या फंडातून म्हाळेवाडी दलित वस्ती मुख्य रस्ता काँक्रिटीकरणसाठी रु. ५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.या सर्वच कामांचा शुभारंभ आमदार राजेश पाटील व जि. प. सदस्य अरूण सूतार यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, नूतन सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जुन्या जाणत्या लोकांना सोबत घेऊन विकासाचे स्वप्न साकारा, गट तट विसरून काम करा. सरपंचांनी बोलून दाखवलेली साहेबांच्या स्मारकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कटिबध्द असून गावासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
जि. प. सदस्य अरुण सुतार यांनी म्हाळेवाडी गावच्या विकासासाठी भरीव निधी देऊन आपले दैवत कै. नरसिंगराव पाटील यांच्या स्वप्नातील आदर्श गाव बनवूया, अशी ग्वाही दिली. धडाडीचे सरपंच सी. ए. पाटील यांनी गावचा विकास हाच आमचा ध्यास असून लोकसहभागातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गावाला आदर्श गाव करण्याबाबत आपले विचार मनोगतातून मांडले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे, पं. सं. चे माजी सभापती बंडू चिगरे , कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस यमाजी गावडे दौलत साखर कारखान्याचे माजी सचिव एस. एल. पाटील शेतकरी संघाचे संचालक विनोद पाटील कोवाडचे माजी उपसरपंच विष्णू आडाव , ग्रामसेवक रविराज चिलम, रवि देसाई , एन .आर.भाटे एन. आर. पाटील , तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल हरी पाटील, रघुनाथ पाटील, वसंत तुकाराम पाटील, ग्रा. पं. सदस्या सौ. अमृता कांबळे ,सौ. शांता नांदवडेकर, मा. सौ. कल्पना पाटील, पो. पाटील जगदिश पाटील यांसह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. सूत्रसंचलन सुनिल कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment