माता, माती आणि मातृभाषेच्या सेवेच व्रत घेणं प्रत्येकाची जबाबदारी - सौ. नंदा फर्जंद - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2021

माता, माती आणि मातृभाषेच्या सेवेच व्रत घेणं प्रत्येकाची जबाबदारी - सौ. नंदा फर्जंद

चंदगड तालूका मराठी अध्यापक संघाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलताना साै. नंदा फर्जद
तेऊरवाडी (एस. के. पाटील)

         स्पर्धेतूनच आपल्याला प्रेरणा मिळते. कौतुकाची पाठीवर पडणारी एक थाप आपल्या जीवणाला कलाटणी देऊन जाते. आपल्या भावनांना , संवेदना व्यक्त करण्यासाठी मातृभाषा हेच सर्वोत्तम माध्यम आहे.आपण कितीही भौतिक प्रगती केली तरी माता, माती आणि मातृभाषेच्या सेवेच व्रत घेणं प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन सौ नंदा फर्जद यांनी केले.

    चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धाच्या बक्षिस वितरण समारंभात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.एन. शिवणगेकर होते. प्रास्ताविक बी. एन. पाटील यांनी केले. स्वागत एस. जी. साबळे यांनी केले.

         वेद इंन्स्टयुटूडचे व्यवस्थापक अजित कडूकर यांनी मराठी अध्यापक संघाने राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा गौरव केला. यावेळी प्राचार्य व्ही. जी. तुपारे, प्राचार्य वाय. व्ही. कांबळे, सरपंच शिवाजी तुपारे, एम.एम. गावडे, टी. टी. बेरडे, शाहू पाटील यांची मनोगते झाली.

      राजभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेला तालुक्यातून ५४० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला एम.वाय. पाटील, सचिन शिरगावकर,  एस.पी. पाटील,व्ही.एल. सुतार ,संजय साबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन रवि पाटील यांनी तर आभार एच.आर. पाऊसकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment