तेऊरवाडी येथे अपघातग्रस्त बेळगावच्या महिलांचा प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन, वाचा काय आहे कारण..... - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2021

तेऊरवाडी येथे अपघातग्रस्त बेळगावच्या महिलांचा प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन, वाचा काय आहे कारण.....

सकाळी  ८ ते दुपारी १२ पर्यंत रणरणत्या उन्हात रस्ता रोको

अपघातग्रस्थ महिलांशी अशा प्रकारे रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. 

तेऊरवाडी (एस. के. पाटील)

              चंदगड तालुक्यातील  कारखान्यातून मोलॅसिस वाहतूक करणाऱ्या  टँकर नं . ( MH 48 T 3724 ) ला तेऊरवाडी ता चंदगड येथील  फडेवाडीच्या मराठी विघ्या मंदिर समोर शनिवारी रात्री साडे दहा वाजता अपघात झाला . यामध्ये रस्त्यावर टँकर पलटल्याने यामधील मोलॅसिस रस्त्यावरच अस्ताव्यस्त पसरले .  सकाळी आठ वाजता बेळगावहून नेसरीला प्रवास करणाऱ्या सौ . अपर्णा कुलकर्णी व सौ . सुरेखा कांबळे यांची स्कूटी क्र .KA23 EU 2080घसरून या मोलॅसिस मध्ये पडल्या . त्यानंतर लिला जाधव ( महागाव ) याही याच ठिकाणी पडल्याने या तिनही महिलांनी याच जागी  रणरणत्या उन्हात मोलॉसिसने माखलेल्या कपडयासह चार तास रास्ता रोको आंदोलन केले .

         रात्री हेमरस वरून  जयगड रत्नागीरीकडे प्रेस मड घेऊन जाणाऱ्या टॅंकरला अपघात झाला. लागलीच स्थानिक युवक राकेश पाटील,सैनिक शिवानंद पाटील,पोलीस पाटील प्रकाश पाटील, नागेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे सह ग्रामस्थानी मदत कार्य चालू केले.सदर माहिती मिळताच आमदार राजेश पाटील यांनी गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला तात्काळ घटना स्थळी पोचण्याचा सूचना केल्या. त्यानुसार रात्री ११ वाजता गडहिंग्लज अग्नी शामक दलाने   पाणी मारून रस्ता साफ केला. यावेळी कोवाड व नेसरी पो .स्टेशनचे कर्मचारी हजर होते.

         मात्र सकाळी ८ वाजता बेळगाहून नेसरीला स्कूटीवरून जाणाऱ्या अपर्णा कुलकर्णी व सुरेखा कांबळे महिलांची स्कूटी येथील मोलॅसिस मध्ये घसरून पडल्याने त्या जखमी झाल्या . यानंतर आणखी एक महिला लिला जाधव याही  या ठीकाणी पडल्या .यानंतर या तीनही महिलांनी रास्ता रोखो केला . प्रशासन जोपर्यंत दखल घेत नाही, रस्ता जोपर्यंत स्वच्छ केला जात नाही तोपर्यंत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले . त्यामूळे कोवाड नेसरी रोडवर प्रचंड वाहतूकीची कोंडी निर्माण झाली .दरम्यान  कोवाड औट पोष्टचे  चव्हाण यानी घटनास्थळी धाव घेऊन महिलांची समजूत काढून वाहतूक सुरू केली . नेसरी पोलिसांचे पथकही  घटनास्थळी दाखल झाले .यावेळी पत्रकार एस.के पाटील , माजी सैनिक लक्ष्मण भिंगुडे , एम.जे पाटील , पो . पाटील प्रकाश पाटील , श्रीकांत पाटील , बबन पाटील यानी सहकार्य केले. आज पुन्हा गडहिंग्लजच्या अग्नीशामक दलाने रस्ता पाण्याने स्वच्छ केला.

         या रस्त्यावरून २५ टन क्षमता असणाऱ्या टँकरमधून जवळपास ३५ टन मोलॅसिस ची वाहतूक केली जात आहे .  प्रत्येक चढण रस्त्यावर मोलॅसीस सांडून मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे -श्रीकांत पाटील (तेऊरवाडी )



No comments:

Post a Comment