चंदगड / प्रतिनिधी
उमगाव (ता. चंदगड) येथील ग्रूप ग्रामपंचायती चे सरपंच गणपती कृष्णा सुतार यांचे विरोधात आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, अवास्तव खर्च करणे, खर्चाचा हिशेब न देणे, आपल्या मर्जीप्रमाणे प्रोसीडीग लिहीणे, स्वताःच्या मूलाला कामगार बनवणे असे आरोप उपसरपंच रूक्माना गावडे, महेश गावडे, लक्ष्मण गावडे, दत्तात्रय सूतार सूप्रिया गावडे, लक्ष्मी गावडे, अपूर्वा पेडणेकर, रंजना कांबळे यानी ठेवून या आठ सदस्यांनी तहसिलदार विनोद रणवरे यांचे कडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यानूसार सोमवार दि १५मार्च रोजी उमगांव ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दुपारी बारा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment