![]() |
कन्नड वेदिकेवर गुन्हा दाखल करण्याचे चंदगडच्या पो. निरीक्षकाना निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते. |
तेऊरवाडी /सी .एल. वृत्तसेवा
बेळगांव येथील शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडीवरील झालेल्या भ्याड हल्याची चौकशी होऊन गुन्हा नोंद करण्याबाबतचे निवेदन मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील यानी चंदगडच्या पोलिस निरीक्षकाना दिले आहे.
काल दिनांक १२ मार्च २०२१ रोजी बेळगांव येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर कन्नड रक्षक वेदीकेच्या गुंडानी पोलीस प्रशासनाच्या समोरच गाडीवर हल्ला करुन त्यावर लावलेला भगवा ध्वज कन्नड वेदीकेच्या गुंडानी तोडुन विटंबना केली.
यामुळे तमाम हिंदुच्या भावना दुखावल्या असुन ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने सामान्य मराठी माणसाला बेळगांव व ईतर भागात फिरणार्या जनतेच्या जिवीतास अशा भ्याड हल्यामुळे धोका संभवतो आहे.
सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असुन या प्रकरणामुळे चंदगड परिसरातील बेळगांवला जाणारे मराठी विद्यार्थी- विद्यार्थीनी ,नागरीक , शेतकरी, व्यापारी यांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी जे कन्नड विदेकीचे गुंड आहेत. त्याची सखोल चौकशी करुन संबधीतावर गुन्हा नोंद व्हावा ही मागणी करण्यात आली.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड या विरोधात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी भावना व्यक्त केली. यावेळी मनसे चंदगड तालूका अध्यक्ष राज सुभेदार, सहकार सेना प्रमूख परशराम मळवीकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवगे, महादेव गुरव, योगेश बल्लाळ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment