जनहित सेवा संस्था' मानवाधिकार संघटनेची विभागीय कार्यकारिणी जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2021

जनहित सेवा संस्था' मानवाधिकार संघटनेची विभागीय कार्यकारिणी जाहीर

जनहित सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देताना चंद्रकांत नेवरेकर सोबत राजू रेडेकर व मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      महाराष्ट्रासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या  'जनहित सेवा संस्थेची' (मानव हक्क व माहिती अधिकार जनजागृती संघटना) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ विभागीय शाखा सुरु करून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. कोवाड (ता. चंदगड) येथील हॉटेल रविराजमध्ये संपन्न झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत नेवरेकर (मुंबई) हे होते.
      भ्रष्टाचार निर्मूलन सह समाजातील शोषित, पीडित, वंचितांना समानतेची वागणूक व न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत असून भारतीय संविधानानुसार मानव अधिकाराचे हनन होणार नाही; यासाठी संस्था अहोरात्र प्रयत्नशील असल्याचे नेवरेकर यांनी सांगितले. संघटनेचे राज्य अध्यक्ष यशवंत विठ्ठल यांच्या सूचनेनुसार नूतन कार्यकारिणी घोषित केली. यात कोल्हापूर लोकसभा मतदार संघ जिल्हाध्यक्ष राजू भरमु रेडेकर (कुदनुर), जिल्हा संपर्कप्रमुख अखलाक भाई मुजावर (महागाव), चंदगड तालुकाध्यक्ष शंकर दत्तू कोले (कालकुंद्री) गडहिंग्लज तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी शशिकांत जाधव (गडहिंग्लज), उपाध्यक्ष ॲड. स्नेहलता साळुंखे, चंदगड तालुका महिला अध्यक्ष भारता विजय कांबळे, जिल्हा महिला सचिव सौ चित्रा चंद्रकांत शिंदे,  माणगाव विभाग प्रमुख हनमंत निर्मळकर, कुदनूर विभाग प्रमुख ताजुद्दीन दस्तगीर सनदी यांना निवडीची पत्रे देण्यात आली. यावेळी अखलाक मुजावर, राजू किटवाडकर, श्रीकांत पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास मारुती पांडुरंग पाटील, विजय कांबळे किसन लोहार, हरीश मुतकेकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कालकुंद्री चे माजी सरपंच विनायक कांबळे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment