उत्साळी येथे जि. प. फंडातून रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण शुभारंभ, सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नातून - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2021

उत्साळी येथे जि. प. फंडातून रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण शुभारंभ, सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नातून

               

उत्साळी (ता. चंदगड) येथे रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करताना जि. प. सदस्य सचिन बल्लाळ. शेजारी माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, पं. स. सदस्य बबन देसाई व इतर. 

चंदगड / प्रतिनिधी

     उत्साळी (ता. चंदगड) येथे उद्घाटन प्रसंगी मी सर्वसामान्य कार्यकर्ता  माणुसकी जपून तालुक्यात विकास गंगा आणली व माणसे जोडत गेलो असे गौरर्वोदगार माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील यांनी व्यक्त केले. जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम मार्गी लागले. उत्साळी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

       भरणूआण्णा पुढे म्हणाले, ``उत्साळी गावासाठी अनेक विकास कामे दिली आणि देत आहे. मी आमदार असतांना 1998 साली या रस्त्यावर डांबर पडले होते. त्यानंतर आता माझ्या कार्यकर्त्या च्या माध्यमातून रस्ता होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. उत्साळी गाव हे माझे असून लोकांनी मला मनापासून स्वीकारले आहे.                          

        यावेळी स्वागत ग्रामपंचायत सदस्य वसंत सुतार व गुरुनाथ मोरे यांनी केले. भाजप प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य  शिवाजीराव पाटील म्हणाले, ``माझी ओळख नसताना देखील आपल्या गावाने गेल्या विधानसभेला मला भरघोस  मतदान केले आहे. त्याचे ऋण येत्या काही दिवसात गावच्या विकासकामातून व्यक्त करेन.      

         जि. प. सदस्य सचिन बल्लाळ म्हणाले, ``गावच्या मागणीनुसार अडकूर ते उत्साळी रस्त्यासाठी 59 लाखाचा निधी लावण्यात मला यश आले, येथून पुढे जास्तीतजास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीन असे मत व्यक्त केले.                                

       यावेळी पंचायत समिती सदस्य बबन देसाई, ऍड. विजय कडुकर, चंदगड चे नगरसेवक दिलीप चंदगडकर, जिल्हा सरचिटणीस रवी बांदिवडेकर, उदय देशपांडे, मुरली बल्लाळ, विजय गावडे, पुंडलिक दळवी, रामराव देसाई, अनिल वाईगडे, नाना देसाई, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देवळी, राजाराम आंबुलकर, शिवाजी आपटेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष सावंत भोसले यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य रुकमाना मटकर यांनी मानले.






No comments:

Post a Comment