ढोलगरवाडीच्या कमांडोने पकडला आसाममध्ये १५ फुटी किंग कोब्रा - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2021

ढोलगरवाडीच्या कमांडोने पकडला आसाममध्ये १५ फुटी किंग कोब्रा

ढोलगरवाडीचा कमांडो परशराम पाटील याने पकडलेला १५ फुटी किंग कोब्रा.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         ढोलगरवाडी (ता. चंदगड) गावचे सुपुत्र भारतीय सैन्यदलातील मराठा लाइफ इन्फंट्री बेळगावचे कंमाडो ट्रेनर नायब सुभेदार पदी बढती मिळालेले कमांडो परशराम सोमाणा पाटील यांनी आज दि.२७ रोजी आसामध्ये आपल्या कर्तव्यावर असताना जंगलात १५ फूटी किंग कोब्रा पकडला. परशराम याच्या या अजब धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नुसता साप म्हटला तरी भल्याभल्यांची पळता भुई थोडी होते. बरेचजन सर्पापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात तर काही जन तर त्याचा जीवच घेण्याचा प्रयत्न करतात. पण या  जवानाने धाडसाने सर्पविश्वातील मोठा अजस्त्र, अत्यंत चपळ असणारा तब्बत १५ फुट लांबीचा किंग कोब्रा   ( महानाग 'नागीन) पकडला. त्यानंतर या किंग कोब्राला परत जंगलात सुखरूप आपल्या मित्रा समवेत व अधिकाऱ्यांच्या समवेत सोडले. सैन्यदलात कर्तव्य बजावणाऱ्या या जवानाचे माध्यमिक शिक्षण ढोलगरवाडी विद्यालयात सर्पाच्या संगतीतच झाले आहे. परशरामच्या धाडसाने ढोलगरवाडी गाव त्याचबरोबर आमच्या सर्पशाळेचा विद्यार्थी या नात्याने  निश्चित त्यांच्या या धाडसाचे तसेच सर्पशाळा व ढोलगरवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या मार्फत  अभिनंदन केल्याचे सर्पमित्र प्रा . सदाशिव पाटील यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment