चंदगड शहराच्या विकासासाठी कटीबध्द - नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2021

चंदगड शहराच्या विकासासाठी कटीबध्द - नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर

नगराध्यक्ष  सौ. प्राची काणेकर

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

         चंदगडच्या शहराच्या सर्वांगीन विकासासाठी मी कटीबध्द असुन चंदगड नगरपंचायतीच्या निवडणूकीनंतर ३ कोटी ४८ लाखांच्या विविध विकास कामांना सुरुवात झाल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

       स्वागत पंचायत समिती सदस्य व चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांनी केले. प्रास्ताविक संजय चंदगडकर यांनी केले. उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रविण वाटंगी यांनी विकास कामांची सविस्तर माहिती दिली.

         आजी-माजी सैनिकांचा घरफाळा संपुर्ण माफ, कोरोनाचे नियोजन सर्व नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते तसेच प्रशासन, डॉक्टर्स, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने पहिल्या टप्याचे नियोजन करुन कमीत कमी जीवीत हानी होईल याची दक्षता घेतली. दुसऱ्या टप्यातसुध्दा सर्वांनी शिस्तीचे पालन करुन कोरोनाचा अटकाव करावा, बांधकाम परवाण्यासाठी कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता नाही. घरगुती तसेच व्यापारी बांधकाम परवाणे नगरपंचायत मधील अभियंत्याकडून मिळण्याची सोय झाली आहे. उतारे व दाखले एक खिडकी योजनेव्दारे विनाविलंब मिळत आहेत. स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष देऊन चंदगड शहर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. चंदगड शहरामध्ये दिवसरात्र साफ सफाई केली जाते. त्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. १३३ महिलांना मोफत शिवण क्लासची सुविधा नगरपंचायतीतर्फे देणेत आली आहे. सन २०१९-२० मधील १ कोटी ९० हजार रुपयांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. त्यापैकी बरीच कामे पुर्ण झालेली आहेत.

     सौ. प्राची काणेकर पुढे म्हणाल्या, ``चंदगड शहराच्या विकासासाठी सर्वसाधारण रस्ता अनुदान, नगरोत्थान योजना, दलितेत्तर योजना, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती विकास योजना, पाणी पुरवठा व मलनिस्सारण व नागरी स्वच्छता, नागरी दळणवळण साधनांचा विकास व संकीर्ण कामे, सामाजिक पायाभुत सुविधांचा विकास, पाणी पुरवठा, मल निस्सारण व्यवस्थेचे बळकटीकरण, सुसज्ज वाचनालय, पर्यायी स्मशानशेड, चंदगड नगर पंचायतीची प्रशासकीय इमारत, पाणी पुरवठा योजना, रिसायकलींग योजना, क्रींडागण इत्यादी कामे लवकर मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा चालु आहे. चंदगडचा रिंगरोड, चंदगड-हिंडगाव-इब्राहीमपूर रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. चंदगड शहरातील वाहतुकीचा अडथळा दुर करण्याचे सर्व ते प्रयत्न चालू आहेत.

         चंदगड शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, चंदगडचे आमदार राजेश पाटील, संग्रामसिंह कुपेकर व विद्याधर गुरबे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सांगितले.

         यावेळी नगरसेवक अभिजित गुरबे, रोहीत वाटंगी, झाकीर नाईक, मेहताब नाईक, आनंद हळदणकर, संजिवणी चंदगडकर, नेत्रदिपा कांबळे, अनुसया दाणी, अनिता परिट, मुमताजबी मदार व माधुरी कुंभार यांच्यासह अल्लीसो मुल्ला, अरुण पिळणकर, राजेंद्र परिट, अशोक दाणी, प्रमोद कांबळे, नौशाद मुल्ला, चंद्रकांत दाणी, सुधिर देशपांडे, अमीर मुल्ला, महेश वणकुंद्रे, मारुती कुंभार, कलीम मदार, यशवंत डेळेकर, रविंद्र कसबल्ले, मारुती पाऊसकर, सुधिर मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हिरामणी हुंबरवाडी यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment