![]() |
बांदराई धनगरवाडा येथील अपघातग्रस्तांना पाटणे वनविभागांची आर्थिक मदत देण्यात आली. |
चंदगड / प्रतिनिधी
कळसगादे पैकी बांदराईवाडा धनगरवाडा (ता. चंदगड) येथील पंढरपूरला देवदर्शनला
निघालेल्या नागरिकांचा अपघात होऊन एका चिमूकलीसह पाच जण मरण पावले. तर दहा जण जखमी झाले. बांदराईसह संपूर्ण चंदगड तालुक्यावर
शोककळा पसरली. अशा प्रसंगी पाटणे वन विभागाच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देत दुःखावर फुंकर
घालण्याचा प्रयत्न केला आहे. वनपरिक्षेत्र पाटणे सर्व वनकर्मचारी यांचे वतीने
प्र.वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी,
वनपाल बाळासाहेब धामणकर, वनरक्षक डि. एम. बडे,
वनरक्षक जी. पी. वळवी,
वनसेवक तुकाराम
गुरव,
मोहन तुपारे, नंदकुमार पाटील, विश्वनाथ नार्वेकर यांनी आज धनगरवाडा येथे
जाऊन काळु लांबोर यांच्या कुटुंबीयांना २० हजार १०० रुपयांची आर्थिक मदत देऊन
त्यांच्या दुःखात सहभागी असलेची भावना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment