अलबादेवी येथील जळितग्रस्त शेतकऱ्याला अप्पी पाटील यांच्याकडून ५१ हजाराची आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2021

अलबादेवी येथील जळितग्रस्त शेतकऱ्याला अप्पी पाटील यांच्याकडून ५१ हजाराची आर्थिक मदत

 

महागाव - जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी उर्फ विनायक पाटील वैभव शिवनगेकर यांना ५१ हजाराची आर्थिक मदत देताना, सोबत अन्य मान्यवर.

चंदगड / प्रतिनिधी

       अलबादेवी (ता. चंदगड) येथील जळितग्रस्त शेतकरी मनोहर पुंडलिक शिवनगेकर यांना केडीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष  विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी त्यांचा मोडलेला संसार सावरण्यासाठी मुलगा वैभव शिवनगेकर यांना रोख स्वरूपात ५१ हजाराची आर्थिक मदत दिली.

       अलबादेवी येथे आठवड्यापूर्वी राहत्या घरी स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याने, घराचे व घरातील ५० हजार रोख रकमेसह जीवनावश्यक वस्तूंचे, संसारोपयोगी साहित्याचे १० लाखाचे नुकसान झाले. शिवनगेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले. समाजातील दानशूर व्यक्तीनी आवाहन केल्यानंतर आपल्या पद्धतीने मदत जाहीर केली.

    नेसरी येथील अमर विश्वनाथ कोरे यांच्या सलूनमध्ये वैभव मनोहर शिवनगेकर नोकरी करतो. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या रोजगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. परंतु अचानक उद्धभवलेल्या या संकटामुळे शिवनगेकर कुटुंबीय हादरून गेले. वैभवला त्याच्या काही मित्रांनी महागाव येथील केडीसीसी बँकेचे माजी व्हा.चेअरमन अप्पी पाटील यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याच्यानुसार ते अप्पी पाटील यांना भेटले.तेव्हा त्यांनी वैभवच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी केली. त्याला कोणत्या स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा आहे, अशी विचारणा करून ५१ हजार रुपये आर्थिक मदत देऊ केली.

      यावेळी गोड साखरचे संचालक संभाजी नाईक,माजी सरपंच तानाजी निकम, विजय नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल पाटील, सोमनाथ पाटील, अर्जुन दिवटे, अनिल घेवडे, सोनू आर्दाळकर,किशोर आसबे, नजीर खलिफ, शिवाजी कोकितकर, दत्ता गोरुले, मल्लेश देशनुरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment