कोदाळी शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले विना शिलाई मास्क, कसे बनविले हे मास्क, वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2021

कोदाळी शाळेत विद्यार्थ्यांनी बनविले विना शिलाई मास्क, कसे बनविले हे मास्क, वाचा.....

 कोदाळी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे प्रात्यक्षिक दाखविताना शिक्षिका.

 चंदगड / प्रतिनिधी 

         कोदाळी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिलाई मशिनचा वापर न करता  न करता फेस मास्क बनविले.

          याचे प्रात्यक्षिक विषय शिक्षिका सूनिता वाजंत्री यांनी विद्यार्थ्यांना दाखविले. घरच्या घरी सुई, दोरा, कात्री, आणि कापड ह्याचा वापर करून मास्क कसा बनवावा ह्याचे मार्गदर्शन केले. या उपक्रमात सर्व मुलांनी सहभाग घेऊन एक वेगळा आनंद अनुभवला. घरच्या घरी मास्क बनवून मुले कोरोना काळात सुरक्षित झाली. या वेळी कोदाळी सरपंच अंकुश गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष दळवी,उपाध्यक्ष रवींद्र गावडे, सागरिका मूंढे,दिगबंर गूरव उपस्थित होते.No comments:

Post a Comment